महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे १११ रुग्ण

महाराष्ट्रात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या १११ झाली असून, त्यातले १६ रुग्ण जीवरक्षक प्रणालीवर आहेत. राज्यातली ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. सात सदस्यांच्या या समितीमध्ये राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. ही समिती राज्य सरकारला या आजाराच्या रुग्णांचं व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यामध्ये मदत करेल. याचबरोबर राज्य सरकारच्या उपाययोजनांवरही लक्ष ठेवणार आहे.