डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश

मुंबईत वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं जारी केलेल्या २८ मार्गदर्शक तत्त्वांचं  उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त शहर डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. विविध उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिकेडून प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही सर्व मार्गदर्शक तत्त्वे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नागरिकांनी वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरतील अशी कृत्यं टाळावीत आणि महानगरपालिकेला सहकार्य करावं, असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलं आहे.