डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात नवीन ८६ हजार ८१४ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३० टक्के वाढ झाली आहे.  यावर्षी  २२ हजार ८१ चार चाकी वाहनांची नोंदणी झाली आहे. ही वाढ सुमारे २८ टक्के आहे. तर ५१ हजार ७५६ नवीन दुचाकी वाहनांची खरेदी नागरिकांनी केली आहे. दुचाकी वाहनांच्या खरेदीत यावर्षी सुमारे २७ टक्के वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त पहिल्या पाच परिवहन कार्यालय अंतर्गत वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.  त्यामध्ये पुणे परिवहन कार्यालय अंतर्गत ११ हजार ५६, पिंपरी चिंचवड अंतर्गत ६ हजार ६४८, नाशिक अंतर्गत ३ हजार ६२६,  मुंबई मध्य अंतर्गत ३ हजार १५४ आणि ठाणे अंतर्गत ३ हजार १०७  वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे, असे परिवहन विभागाकडून कळविण्यात आले.