डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कोल्हापूर : नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून गोरगरीबांना आरोग्य सेवा देण्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन

पंधराव्या वित्त आयोगातून उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांतून शहरातल्या गोरगरीबांना चांगल्या आरोग्य सेवा सुविधा देण्याचं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केलं. कोल्हापूर महापालिकेच्यावतीनं नव्यानं सुरू करण्यात आलेल्या तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.

 

या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत नागरीकांवर मोफत औषधोपचार केला जाणार आहे. यामुळे खासगी दवाखान्यावर नागरिकांचा होणारा खर्च कमी होईल,असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.