शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच उद्यापासून देशात बचत उत्सव सुरु होत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल उद्यापासून लागू होणार आहेत, या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांनी आज राष्ट्राला संबोधित केलं. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे सर्वांचीच बचत होणार आहे असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री- १२ लाख रुपयेपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर माफ केल्यामुळे आणि जीएसटीतल्या सुधारणांमुळे मिळून करदात्यांची एकूण बचत अडीच लाख कोटी रुपयांची होईल. आणि आपली स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल असं ते म्हणाले. व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांनाही या सुधारणांचा फायदा होणार असून त्यांनी हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहचवावा असं आवाहन त्यांनी केलं. या सुधारणा आत्मनिर्भरतेची वाट सुकर करत असल्याचं सांगत त्यांनी स्वदेशी वापराचं आवाहन नागरिकांना केलं.
“नागरिक देवो भव” हाच आपल्या सरकारच्या प्रशासनाचा मंत्र आहे असं ते म्हणाले.