डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 27, 2025 7:41 PM | GST reforms

printer

GST करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार

वस्तू आणि सेवा कररचनेतले बदल गेल्या सोमवारपासून लागू झाले आहेत, हा बचत उत्सव असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना सांगितलं. या करसुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांवरचा अप्रत्यक्ष करांचा बोजा कमी होणार आहे.

 

(जीएसटीतल्या बदलांमुळे आरोग्यासाठी आवश्यक अनेक वस्तू आणि सेवांवरचे कर कमी झाले आहेत. व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्सवरचा कर आता १८ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलं आहे. या खेरीज दूध आणि दुधाचे पदार्थ, सुकामेवा आणि उतर पौष्टिक खाद्यपदार्थांवरचा कर शून्य किंवा ५ टक्के झाला आहे. आरोग्याच्या देखभालीसाठी स्वदेशी उत्पादनंच वापरावी असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी नुकतच केलं होतं.)