डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 26, 2025 6:05 PM | GST reforms

printer

GST Reforms: सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यांवरचा जीएसटी कर

केंद्र सरकारनं अलिकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरल्या आहेत. सर्वसामान्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध साहित्यावरच्या जीएसटी करांविषयी जाणून घ्या…

 

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या विविध स्टेशनरी साहित्यावरचा जीएसटी कमी केल्याने आता सामान्यांवरचा शैक्षणिक खर्च कमी व्हायला मदत होणार आहे. या सुधारणांतर्गत वह्या, आलेख वही, गिरमिट, पेन्सिल अशा विविध वस्तू पूर्णपणे करमुक्त केल्या आहेत. त्यामुळे हे साहित्य अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार आहेत. तसंच, अडीच हजार रुपयांपेक्षा कमी विक्री मूल्य असलेल्या पादत्राणांवरच्या जीएसटीतही कपात करण्यात आली आहे. यासोबत लाकूड, दगड, धातूंपासून बनवलेल्या वस्तूंवरही करांचा दर ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.