वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. बांधकाम क्षेत्रातल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया…
जीएसटी दर सुधारणेमुळे ग्राहक आणि उद्योग दोघांनाही मोठा फायदा होणार आहे. नव्या कररचनेनुसार वाळू आणि चुनखडीच्या विटांवरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. या विटांचा वापर घरांच्या बांधकामासाठी विशेषतः ग्रामीण भागात केला जातो. यावरला जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांचे दरही कमी होणार आहेत. यामुळे घर बांधण्यासाठी कमी खर्च येईल. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात पक्की घरं बांधण्याचं प्रमाण वाढेल. सर्वांसाठी पक्की घरं बांधण्याच्या सरकारच्या मोहिमेसाठी हे फायद्याचं ठऱणार आहे. वीटभट्ट्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाद्वारेच चालवल्या जातात. विटांवरील कर कमी झाल्यामुळे या उद्योगांना कमी भांडवली गुंतवणूक करावी लागेल. ग्राहकांकडून मागणी वाढल्याने त्यांचा खप वाढेल. यामुळे या उद्योगांना नफा मिळेल आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होईल.