वस्तू आणि सेवा करातल्या कपातीमुळे गेल्या महिन्यात २२ तारखेपासून जीएसटी बचत उत्सवाला सुरुवात झाली आहे. त्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होत आहे. जीएसटी बचत उत्सवाचा देशाच्या वाहन क्षेत्राला बळकटी देण्यात किती महत्त्वाचा वाटा आहे.
सरकारने वाहन क्षेत्रासाठी जारी केलेल्या नव्या जीएसटी दरांनुसार, अठराशे सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर ५ टक्के तर अठराशे सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवर १८ टक्के कर आकारला जातो. तसंच, टायर आणि गिअर्स सारख्या ट्रॅक्टर निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर ५ टक्के कर आकारला जात आहे. बस आणि ट्रक तसंच डिलिव्हरी व्हॅनवर आकारला जाणारा जीएसटी १८ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी या वाहनांवर २८ टक्के जीएसटी आकारला जात होता. यासह मोटार आणि दुचाकी वाहनांच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवरचा करही १८ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. या दरकपातीमुळे सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत वाहनं विकत घेता येतील, वाहतुकीवरचा खर्च कमी होऊन निर्यातीवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार आहे.