२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…
जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमेंटवरचा कर २८ टक्क्यावरून १८ टक्क्यावर आल्यामुळे घरं आणि पायाभूत सुविधा उभारण्याचा खर्च कमी झाला आहे. संगमरवर आणि ग्रॅनाइटच्या ब्लॉक्सवरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आला आहे. तसंच विटांवरही आता ५ टक्के जीएसटी लागत असल्यामुळे छोटी बांधकामं स्वस्त झाली आहेत. या बदलांमुळे घरं खरेदी आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक परवडणारा होऊन सर्वांना घर देण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाला याचा मोठा हातभार लागत आहे.