वस्तू आणि सेवा परिषदेनं जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. आज ऐकूया जम्मू काश्मीरमधे होणाऱ्या याच्या परिणामाविषयी…
नव्या जीएसटी सुधारणांमुळे जम्मू-काश्मीरमधल्या हस्तकला, शेती, पर्यटन आणि विशेष उत्पादनांच्या स्पर्धात्मकतेत वाढ होणार आहे. जीएसटीमधली ही करकपात जम्मू-काश्मीरच्या विविध क्षेत्रांमधल्या औद्योगिक विकासासाठी, पर्यटनवाढीसाठी आणि ग्रामीण जीवनाच्या उन्नतीसाठी सहाय्यभूत ठरणार आहे. भरतकाम, शाली, लाकडी कोरीव काम, दागिने, रेशमी गालिचे यांसारख्या कलाकृती आणि हस्तकला यावरचा कर १२ टक्क्यांवरून घटवून ५ टक्के केल्यानं या कलांच्या माध्यमातून निर्मिलेली उत्पादनं अधिक परवडणारी आणि विक्रीयोग्य ठरणार आहे. तसंच पर्यटन आणि हॉटेल भाड्यांवरचा जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्यामुळे पर्यटन उद्योगाला चालना मिळेल.