डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 5, 2025 12:30 PM | GST reforms

printer

GST Reforms : वस्त्रोद्योग उद्योगाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. वस्त्रोद्योग उद्योगाविषयी जाणून घ्या…

 

सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनुसार हस्तनिर्मित धाग्यांवरील जीएसटी १८ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे.  याशिवाय अडीच हजारांपेक्षा कमी किमतीच्या रेडिमेड कपड्यांवरील जीएसटी ५ टक्के झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांना विविध फॅशनचे कपडे परिधान करणं सहज परवडणार आहे. वस्त्रोद्योगावरील जीएसटी कमी झाल्यामुळे कपड्यांचे दरही कमी होणार आहेत. यामुळे कपड्यांची मागणी वाढेल आणि उत्पादनही वाढेल. तसंच निर्यातीतही वाढ होणार आहे.  याचा सगळ्यात मोठा फायदा मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीयांना होणार आहे. यामुळे भारताला जागतिक स्तरावर वस्त्रोद्योगाचं केंद्र बनायला मोठी मदत मिळेल यात शंका नाही.