जीएसटी करप्रणालीतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या असून त्याचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. अप्रत्यक्ष करप्रणाली सुलभ करण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. जाणून घेऊया छोट्या कार आणि दुचाकींवरच्या कमी झालेल्या जीएसटीबद्दल…
जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणांअंतर्गत छोट्या कारवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका झाला आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांवरचा आर्थिक तणाव कमी होऊन छोटी शहरं आणि गावांमध्ये छोट्या कारच्या खरेदीला चालना मिळेल. याशिवाय, ३५० सीसीपर्यंतच्या दुचाकींवरचा २८ टक्के जीएसटी १८ टक्के झाल्यामुळेही मध्यमवर्गाला दिलासा मिळाला आहे. यामुळे ग्राहकांना तर फायदा होईलच, शिवाय उत्पादन आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील, अशी आशा आहे.