वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया.
विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी सरकारने शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वही, ग्राफबुक, शार्पनर आणि पेन्सिल यांच्यावरील १२ टक्के जीएसटी कमी करून तो पाच टक्के करण्यात आला आहे. तसंच खोडरबरवरचा ५ टक्के जीएसटी रद्द करून तो शून्य करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कंपास पेटी, कलर बॉक्स यांच्यावरील जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्के झाला आहे. या वस्तूंचे दर कमी झाल्यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.