वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात क्रीडा साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…
केंद्रसरकारने वस्तू आणि सेवा करामध्ये केलेल्या सुधारणांमध्ये खेळणी आणि क्रीडा साहित्यावरचा वस्तू आणि सेवा कर १२ टक्क्यांवरुन ५ ट्क्क्यांवर आणला आहे. या सुधारणेमुळे ग्राहक आणि क्रीडा सहित्य विक्रेत्यांना दिलासा तर मिळेलच तसंच स्वदेशी खेळण्यांच्या उद्योगालाही चालना मिळेल. खेळण्यांवरचा जीएसटी कमी केल्यामुळे मुलांना खेळाला प्रोत्साहन मिळेल. खेळण्याचे स्वदेशी उत्पादक हे लघू आणि मध्यम उद्योजक आहेत, त्यांना या कररचनेतील सुधारणेमुळे स्वदेशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्यासाठी बळ मिळेल.
वस्तू आणि सेवा कर परिषदेने सायकलवरचा जीएसटी १२ टक्क्यावरून ५ टक्क्यांपर्यंत आणला आहे. यामुळे सायकल परवडणाऱ्या दरात मिळू लागतील यातून फिरस्ते, ग्रामीण भागातल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना फायदा होईल. एवढंच नाही तर पर्यावरणपूरक जीवनशैलीला चालना मिळेल.