वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात खाद्य पदार्थांबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घेऊया…
अनेक खाद्य पदार्थ्यांवरील जीएसटी कमी करून सरकारने ग्राहकांना दिलासा दिला आहे. पिझ्झा ब्रेड, खाकरा आणि चपाती या पदार्थ्यांना नव्या कररचनेनुसार करमुक्त करण्यात आलं आहे. तसंच पराठा आणि परोटा हे पदार्थही करमुक्त झाले आहेत. यामुळे या पदार्थांचा दर कमी होणार असून सर्वसामान्यांच्या खिशावरील ताणही कमी होणार आहे. सॉसेज, करी पेस्ट, मायोनीज आणि मसाल्यांवरील कर १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. नागरिकांना पोषणतत्वं मिळावीत, परवडणाऱ्या दरात खाद्य पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने जीएसटी दर कमी केले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचं मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरिक सांगत आहेत. दरम्यान, नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करावी, देशांतर्गत उद्योगांना तसंच लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे.