वस्तू आणि सेवा करांमध्ये केलेल्या सुधारणा आजपासून झाले. याअंतर्गत जीएसटीचा १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त ५ आणि १८ टक्के अशा दोन टप्प्यांमध्येच जीएसटी आकारला जात आहे. याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून…
जीएसटी दरांतल्या या सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि मध्यमवर्ग, युवा आणि देशभरातल्या ग्राहकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जीएसटीचे नवे दर म्हणजे फक्त कर नसून जीएसटी बचत उत्सव आहे, आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं.
जीएसटी प्रणालीत झालेल्या सुधारणा म्हणजे गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांसाठी काम करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली.
करप्रणालीतल्या सुधारणा हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
या नव्या करप्रणालीत शालेय वस्तूंवरचा जीएसटी पूर्ण रद्द करण्यात आला आहे. याबद्दल ऐकू या एका शिक्षकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया.