सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून चालताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या सर्व समावेशक प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय खर्चासाठी उपयुक्त ठरणारा आरोग्य विमा आणि आयुर्विमा संरक्षण क्षेत्रातही नवनवीन योजना आणल्या आहेत.
आकस्मिक संकटांमुळे असुरक्षित होऊ शकणाऱ्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरणारा विमा सर्वांना परवडणाऱ्या किमतीत मिळावा यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यांचा समावेश असलेल्या जन सुरक्षा योजना सुरू केल्या.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत अपघाती मृत्यू आणि अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास किमान हप्त्यावर दोन लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाल्यास किमान हप्त्यावर आर्युविम्याचा परतावा मिळू शकतो. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही पूर्णपणे सरकारद्वारे वित्तपुरवठा होणारी जगातील सर्वात मोठी वैद्यकीय विमा आणि हमी योजना आहे.