डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 20, 2025 7:36 PM | Next Gen GST

printer

जीएसटीचे येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने कर संरचना सुलभ करण्यासाठी आणि नागरिकांवरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी सुधारणा केल्या आहेत. येत्या सोमवारपासून नवे दर लागू होणार आहेत. या नवीन कररचनेत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र सरकारने इलेक्ट्रॉनिक उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. दूरचित्रवाणी संच, एअर कंडिशनर, डिशवॉशर यांसारख्या वस्तुंवरचा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. या सुधारणांमुळे उपकरणांची मागणी वाढून देशांतर्गत उत्पादकांना बाजारपेठेत वाव मिळेल. तसंच, या उपकरणांसाठी लागणाऱ्या वायरिंग, कूलिंग सिस्टम, एलईडी पॅनेलचे पुरवठादार आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी देखील ही नवी कररचना लाभदायक ठरणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.