वस्तू आणि सेवा कराअंतर्गत केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या कर सुधारणांमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार स्वस्त होणार आहेत.
जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणांनुसार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर रद्द केला असल्यानं उपचारांवरच्या खर्चात मोठी बचत होईल. या व्यतिरिक्त, गॉझ, बँडेज, रोगनिदान चाचणी संच, ग्लुकोमीटर आणि थर्मामीटर यांसारख्या विविध वैद्यकीय उत्पादनांवरील जीएसटीही १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस यांच्यावरचा कर कमी करून ५ टक्के इतका कमी केला आहे.
आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या प्रीमियमवरही आता शून्य जीएसटी लागू झाल्यानं प्रीमियमची रक्कमही लक्षणीयरीत्या कमी होईल. औषध आणि विमा, अशा दोन्ही क्षेत्रात काम करणारे संतोष गायकवाड याबाबत म्हणाले.
तर विमा क्षेत्रात काम करणारे अभिषेक परब म्हणाले…