नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून, यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून, गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदी च्या वस्तूंबरोबर वाहन खरेदीमध्येही तेजी दिसून आली. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी असून, हॉलमार्क-प्रमाणित हलक्या दागिन्यांनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
Site Admin | October 19, 2025 2:56 PM | GST Bachat Utsav
GST सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर