डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 22, 2025 10:24 AM | GST Bachat Utsav

printer

आजपासून देशात ‘जीएसटी बचत उत्सव’ सुरू

शारदीय नवरात्रौत्सवाबरोबरच आजपासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरु होत आहे. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर रचनेत सुधारणा करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय आजपासून लागू होणार  आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या उत्पादनांच्या किमतीवर तसंच ग्राहकांवर याचा सकारात्मक परिणाम  होणार आहे. दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तू आणि सेवांवरचा कर कमी झाल्यामुळे मोठी बचत होणार आहे.