August 24, 2025 1:11 PM

printer

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटीची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार

येत्या तीन आणि चार सप्टेंबर रोजी जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर परिषदेची छप्पन्नावी बैठक नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकी दरम्यान जीएसटीशी संबंधित घेण्यात आलेल्या काही निर्णयांमध्ये बदल करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे.