August 15, 2025 8:25 PM

printer

जीएसटीमधले १२ आणि २८ टक्क्यांचा टप्पा काढून टाकण्याचा अर्थमंत्रालयाचा प्रस्ताव

वस्तू आणि सेवा करांतर्गत येणाऱ्या सर्व वस्तूंवर ५ टक्के आणि १८ टक्के अशा दोन स्तरात दर निश्चित करावेत, असा प्रस्ताव अर्थमंत्रालयानं वस्तू आणि सेवा कर परिषदेला पाठवला आहे. या नव्या प्रणालीनुसार शेतीसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू, आरोग्याशी संबंधित वस्तू, हस्तकलेच्या वस्तू आणि विमा यांच्यावर ५ टक्के जीएसटी लागेल, तर इतर वस्तू १८ टक्के जीएसटीच्या स्तरात येतील. मात्र, सिगरेट, तंबाखू, साखरयुक्त पेयं आणि पानमसाला अशा आरोग्यासाठी हानीकारक असलेल्या वस्तूंवर आत्ताप्रमाणेच जास्त जीएसटी द्यावा लागेल.