डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्ष पूर्ण

वस्तू आणि सेवा कर प्रणालीला आज आठ वर्षं पूर्ण झाली. आर्थिक एकात्मता आणि कर सुधारणांच्या दिशेनं एक मोठा बदल म्हणून २०१७ मध्ये GST प्रणाली लागू करण्यात आली. त्यामुळे भारतातील अप्रत्यक्ष करांची मालिका एकात्मिक प्रणालीत रूपांतरित झाली. जीएसटीने कर अनुपालन सोपे केले असून व्यवसायांसाठी खर्च कमी केला आहे. तसंच राज्यांमध्ये वस्तूंची अखंड वाहतूक सुनिश्चित केली आहे. देशातील वस्तू आणि सेवा कराचे दर जीएसटी परिषदेद्वारे निश्चित केले जातात, ज्यामध्ये केंद्र आणि राज्य तसंच केंद्रशासित प्रदेश सरकारांचे प्रतिनिधी समाविष्ट असतात.

 

  सध्या, देशाच्या जीएसटी रचनेत ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे चार मुख्य थर आहेत. जीएसटीने उत्पादन शुल्क, सेवा कर, व्हॅट आणि इतर अप्रत्यक्ष कर काढून टाकून एकच कर प्रणाली सुरू केली आहे. करदाता सेवा महासंचालनालय मुंबई विभाग आज वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा आठवा वर्धापन दिन साजरा करत आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा