डिसेंबर २०२५ मध्ये जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कराचं एकंदर संकलन सुमारे एक लाख ७५ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत ही वाढ ६ पूर्णांक १ दशांश टक्के आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी रुपये इतकं होतं. डिसेंबर २०२५ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३४ हजार २८९ कोटी रुपये, तर राज्य जीएसटी संकलन ४१ हजार ३६८ कोटी रुपये इतकं होतं.