वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यानुसार ट्रक, डिलिव्हरी व्हॅन यासारख्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.
लघु आणि मध्यम मालवाहतूकदारांना सुलभपणे मालवाहतूक करता यावी या उद्देशानं केलेल्या या कर कपातीमुळे देशातल्या दळणवळण क्षेत्राचं पुनरुज्जीवन होऊ शकेल. जीएसटी कमी झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या प्रति टन वाहतुकीचा दर कमी होऊन पुरवठा साखळीवर अनुकूल परिणाम होईल, तसंच निर्यातीतली स्पर्धा वाढेल.