भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत गेल्या दशकातील नवरात्रामधील सर्वाधिक उलाढाल यावेळी दिसून आली. सरकारनं केलेल्या नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमुळं ही उलाढाल झाली आहे. करांचे दर कमी झाल्यामुळं उत्पादनं खरेदी करणं अधिक सुलभ झालं आहे. या उपाययोजनांमुळं किंमती कमी होण्यासोबतच ग्राहकांच्या आकांक्षाही वाढल्या आहेत. कुटुंबांना नवीन वाहनांची खरेदी, घरगुती उपकरणांमध्ये गुंतवणूक आणि जीवनशैलीच्या वस्तूंवर अधिक मुक्तपणे खर्च करणं शक्य झालं आहे.
परिणामी उत्सवाचा आनंद विक्रमी वापरामध्ये रुपांतरित झाला आहे. प्रमुख कार उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, नवरात्र काळात विक्रीत लक्षणीय वाढ दिसून आली. गेल्या वर्षीच्या याच उत्सवाच्या कालावधीच्या तुलनेत ही वाढ 60 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या नवरात्रात मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीमध्ये दोन अंकी वाढ दिसून आली.