वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात बालसंगोपनासाठीच्या वस्तूंबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया…
व्हॉईस कास्ट
(बालसंगोपनासाठी लागणाऱ्या विविध वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र सरकारने सामान्य माणसावरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बाळांसाठी लागणाऱ्या दुधाच्या बाटल्या, डायपर्स अशा आवश्यक वस्तुंवरचा कर १२ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. त्यासोबतच बालआरोग्य आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी उच्च तापमानावरचं दूध पूर्णपणे करमुक्त केलं आहे. तापमापकावरचाही जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के केला आहे. बाळांसाठीच्या आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणं हा यामागचा उद्देश आहे.)