जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. यामुळं अनेक वाहने स्वस्त होणार आहेत. दुचाकी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भागांवर लागणारा जीएसटी सरकारनं २८ टक्क्यांवरून १८ टक्के इतका केला आहे. तसंच, १० प्रवासी क्षमता असलेल्या बसवरचा जीएसटीही २८ वरून १८ टक्के करण्यात आला आहे. अठराशे सीसीची क्षमता असलेल्या ट्रॅक्टरवरही आता ५ टक्के जीएसटी लागणार असून यामुळे देशांतर्गत मागणी आणि निर्यातीला प्रोत्साहन मिळेल, असा अंदाज आहे.
Site Admin | September 19, 2025 7:40 PM | GST
जीएसटी दर कपातीमुळे वाहने स्वस्त होणार
