जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकतीच जीएसटी कररचनेत सुधारणा केली. हे नवीन दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत. विविध क्षेत्रांप्रमाणे ऑटोमोबाईल क्षेत्रातही करांच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दुचाकी आणि लहान चारचाकी गाड्यांवरचा जीएसटी आता २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. याचा फायदा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबं, तरुण व्यावसायिक आणि गिग कामगारांना होणार आहे. छोट्या चारचाकींवरच्या जीएसटीमध्येही कपात करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांसाठी गाड्या आता अधिक परवडणाऱ्या दरात मिळणार आहेत.
Site Admin | September 19, 2025 3:28 PM | Next Gen GST
GST: ऑटोमोबाईल क्षेत्रात करांच्या दरात कपात