जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी करांमध्ये सुधारणा केल्या. अनेक क्षेत्रांमध्ये दर कमी केल्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे करही कमी करण्यात आले आहेत. देशातली ६५ ते ७० टक्के मालवाहतूक करणाऱ्या ट्रकसारख्या वाहनांवरचा २८ टक्के कर १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे ट्रकसाठी करावा लागणारा आगाऊ भांडवली खर्च आणि प्रतिटनावर होणारा मालवाहतूक खर्चही कमी होतो. यामुळे कृषीसंबंधित सामग्री, सिमेंट, स्टील तसंच ई-कॉमर्स डिलिव्हरी स्वस्तात होऊन, देशातल्या पुरवठा साखळीचा फायदा होणार आहे.
Site Admin | September 18, 2025 8:27 PM | Next Gen GST
GST: व्यावसायिक वस्तुंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरचे कर कमी