जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. आज जाणून घेऊया, अशा काही वस्तूंबद्दल, ज्यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.
नव्या कररचनेत, लाकूड, दगड किंवा धातूंपासून घडवलेल्या मूर्तींवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. काचेच्या मूर्ती, तसंच लोखंड, ॲल्युमिनियम, पितळ आणि तांब्यापासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंवरच्या जीएसटीतही ही घट झाली आहे. अडीच हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या पादत्राणांवर पूर्वी १२ टक्के जीएसटी लागत असे, तो आता ५ टक्के झाला आहे. नवीन जीएसटी दर येत्या २२ तारखेपासून लागू होणार आहेत.