जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. या सुधारणेमुळे अनेक क्षेत्रांमध्ये तसंच वस्तुंवरची कराची टक्केवारी कमी झाली आहे. यात सगळ्यात जास्त प्रमाण हे १२ टक्क्यावरून ५ टक्के इतक्या कपातीचं आहे. क्रीडा साहित्य, व्यायामासाठीची उपकरणं, हातमोजे, मासेमारीचं साहित्य अशासारख्या वस्तुंवरचा कर १२ टक्क्यावरून ५ टक्के केला आहे. या निर्णयामुळे या वस्तु परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होऊ शकतील आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसंच, बांबूच्या फरश्या, लाकडी पिंप अशांसारख्या लाकूड उत्पादनांवरचा करही १२ टक्क्यावरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. येत्या २२ तारखेपासून हे नवे दर लागू होतील.
Site Admin | September 15, 2025 8:36 PM | NextGenGST
जीएसटी कररचनेत सुधारणा, नागरिकांना दिलासा
