वाहन क्षेत्रातल्या जीएसटी सुधारणांमुळे त्यातल्या टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार आहे. या नव्या सुधारणांनुसार ३५०सीसी पर्यंतच्या बाईक्स, बसेस, चारचाकी गाड्या, १८०० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेचे ट्रॅक्टर आणि विविध सुट्या भागांच्या किंमतीत घट होणार आहे. पर्यायाने वाहन विक्री वाढून त्यामुळे पुरवठा साखळीतल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे उत्पादन, विक्री, वित्तपुरवठा आणि देखभालीसारख्या विविध घटकांमधे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते. जीएसटी सुधारणांमुळे मागणी वाढणार असून चालक, मेकॅनिक आणि वाहनाशी संबंधित इतर सेवा देणाऱ्या क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मिती होणार आहे.
Site Admin | September 12, 2025 2:45 PM | GST
जीएसटी सुधारणांमुळे टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार
