डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 12, 2025 1:57 PM | GST

printer

जीएसटी करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करात सूट

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. या नवीन कररचनेनुसार, काही आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी शून्य करण्यात आला आहे. यात अति-उच्च तापमानाचं दूध, प्री-पॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेले तांदूळ, गहू आणि डाळी तसंच, सर्व प्रकारचे ब्रेड यांचा समावेश आहे. वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.