जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना केल्या आहेत. घाऊक तसंच किरकोळ विक्रेते दोघांनाही हे फलक लावावे लागणार आहेत. तसंच जीएसटीच्या वेबसाइटवरही ही यादी प्रदर्शित करावी लागणार आहे. विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळानं या सूचना केल्या.
दरकपातीमुळं ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती किमान १० टक्क्यांनी तर वाहनांच्या किंमती १२ ते १५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे. ग्राहकोपयोगी वस्तू निर्मात्या कंपन्यांनी या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत योग्यरितीने पोहोचवण्याची खबरदारी घ्यावी, यासाठी सरकारनं त्यांना स्पष्ट निर्देश द्यावे अशी मागणीही संघटनांनी केली आहे.