डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 10, 2025 2:40 PM | GST

printer

फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे. 

 

अन्न, औषधं, शेतीविषयक सामग्री, मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर, ग्रॅनाईटसारखे दगड, बांबूपासून बनणाऱ्या फरश्या, विविध प्रकारचे गालिचे, रजया यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

 

घर सजावटीसाठी लागणारं लाकडी साहित्य, सुशोभनाच्या वस्तू, लाकडी आणि दगडी मूर्ती, फोटोफ्रेम्स, आरसे, पॅकिंगसाठी लागणारं साहित्य, मेणबत्त्या तसंच विविध प्रकारचं हस्तकला साहित्य, मोती आणि प्रवाळ यांवरचा करही १२ टक्क्यावरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. बांधकाम आणि गृहनिर्मितीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारची सिमेंट, वातानुकूलित यंत्र यावरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.

 

बायोगॅस, सौर उपकरणं, पवनचक्की अशा विविध उर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्यावरचा करही १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे.  बायोडिझेल, कोळसा आणि तत्सम इंधन घटक यांवरचा जीएसटी मात्र १२ टक्क्यांवरून १८ टक्के इतका वाढवण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.