वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीमधील व्यापक सुधारणा सहकारी क्षेत्राला बळकटी देतील, उत्पादने अधिक स्पर्धात्मक होतील, उत्पादनांची मागणी वाढेल आणि सहकारी संस्थांचे उत्पन्न वाढवेल. असा विश्वास सहकार मंत्रालयानं काल व्यक्त केला.
जीएसटी सुधारणा ग्रामीण उद्योजकता आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सहकारी संस्थांना प्रोत्साहन देतील आणि लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरांत उपलब्ध होतील देशातील १० कोटींहून अधिक दुग्ध उत्पादकांना फायदा होईल, शाश्वत कृषी प्रणालींना चालना मिळेल आणि लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. असंही मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे.