आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरची १८ दिवसांची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला मायदेशी परत यायला निघाले आहेत. उद्या ते भारतात पोहोचतील. १५ जुलै रोजी पृथ्वीवर परतल्यानंतर ते पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झाले होते. या महत्त्वाच्या मोहिमेनंतर आपल्या कुटुंबियांना आणि आप्तेष्टांना भेटण्याची आतुरता शुक्ला यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. आपल्या मूळ गावी लखनौला जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. जून महिन्यात ॲक्झिओम ४ मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचणारे शुक्ला हे पहिले भारतीय बनले.
Site Admin | August 17, 2025 2:01 PM
अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन
