डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या वसतिगृहाचं सिल्लोड इथं भूमीपूजन

केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून अल्पसंख्याक, दुर्बल आणि गरजू घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास केला जाईल, असं प्रतिपादन, केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाचं भूमिपूजन काल रिजीजू यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या पहिल्या अल्पसंख्याक मुलां-मुलींसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहासाठी ३६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.