ग्रीनलँड हा देश ताब्यात घेण्याच्या हालचाली अमेरिकेनं सुरू केल्यानंतर रशियानं त्याचा विरोध केला आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा नैसर्गिक भाग नसून वसाहतवादाच्या हव्यासामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या सनदेच्या धोरणाचं उल्लंघन केल्याचं मत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केलं आहे. एका वार्ताहर परिषेत ते म्हणाले की, ग्रीनलँड ही डेन्मार्क ऐतिहासिक वसाहत असून तो २० शतकाच्या मध्यात डेन्मार्कशी संलंग्न झाला होता. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यान्यूयल मॅक्रोन यांनीही या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी युरोपियन देशांच्या नेत्याची तातडीची बैठक पॅरिसमध्ये बोलावली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या बैठकीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
Site Admin | January 21, 2026 1:50 PM | Greenland | Russia | US
ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचालींना रशियाचा विरोध