डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत ग्रीन शिपिंग परिषद

मुंबईत आज ग्रीन शिपिंग परिषद झाली. समुद्रात होणारं प्रदुषण कमी करण्यावर याचा भर होता. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे महासचिव आर्सेनिओ डॉमनिग्ज आणि केंद्रीय जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यावेळी उपस्थित होते. कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भारताचा भर आहे, असं ते यावेळी म्हणाले. सर्वांनी सागरी संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असं आवाहन डॉमनिग्झ यांनी केलं.