डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारत आणि नेपाळ वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज त्यांचे नेपाळचे समकक्ष मंत्री अनिल कुमार सिंह यांच्याबरोबर नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत भारत आणि नेपाळ यांच्यातल्या वाहतूक कराराच्या तररतूदीत सुधारणा करणाऱ्या विनिमय पत्राची देवाणघेवाण झाली. या पत्राद्वारे जोगबनी – बिराटनगर दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरु करून कंटेनर आणि  ठोक मालवाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोलकाता आणि विशाखापट्टणम बंदरातून नेपाळपर्यंत मालवाहतूक करणं सुलभ होणार आहे. बैठकीत एकीकृत चेक पोस्ट, इतर पायाभूत सुविधांचा विकास आणि व्यापार सुविधा वाढवण्याबाबतही  चर्चा झाली.