भारतातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. ही वाढ गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीतली असून मेक इन इंडिया कार्यक्रमाची ही सफलता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. २०१४-१५ यावर्षात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात ३१ अब्ज डॉलर्स होती. ती यंदा १३३ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
Site Admin | August 16, 2025 8:23 PM | Minister Piyush Goyal
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ४७ टक्के वाढ