प्रसारण सेवा नियमन विधेयकाच्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्यास मुदत वाढ

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रसारण सेवा नियमन विधेयक २०२४ च्या मसुद्यावर अभिप्राय आणि सूचना देण्याची मुदत १५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे, यावर विचारविनिमय करून कायद्याचा नवा मसुदा तयार केला जाईल, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे. विधेयकाच्या मसुद्यावर विविध संघटनांकडून अनेक शिफारशी, अभिप्राय आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत, असही मंत्रालयानं म्हटलं आहे. यापूर्वी, या विधेयकाचा मसुदा भागधारक आणि सर्वसामान्यांच्या सूचनांसाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वजनिक करण्यात आला होता.