डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार

एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत. केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित पत्रकारपरिषदेत आज ते बोलत होते.

 

निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी राबवलेल्या  तसंच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपक्रमांचा उल्लेख सिंग यांनी केला. प्रसूतीच्या वेळी अपत्याचा मृत्यू झाला असला तरीही महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा फायदा, निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल स्वरुपात हयातीचे दाखले इत्यादी सुधारणांची माहिती डॉ. सिंग यांनी दिली.

 

भ्रष्टाचारमुक्त आणि तत्पर प्रशासनासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल त्यांनी सांगितलं. दैनंदिन कामकाजात क्षमता आणि दर्जा सुधारण्यासाठी कर्मयोगी मंचाचा वापर करण्यात आला आहे. तसंच रिक्त पदं भरण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात येत आहेत असं ते म्हणाले. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून सुमारे साडेचार लाख रिक्त पदं भरली गेली आणि १९ हजार पदोन्नती प्रकरणं वेगाने निकाली निघाली असं सिंग यांनी सांगितलं.

 

नागरिक प्रथम, राष्ट्र प्रथम या तत्त्वानुसार सार्वजनिक तक्रार मंचांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून दरवर्षी सुमारे २६ लाख तक्रारींचा निपटारा केला जातो असंही ते महणाले. कार्मिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी या पत्रकारपरिषदेला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा