गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील. उद्या सकाळी ११ वा. त्यांचा शपथविधी होईल. या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं. त्यांना रेल्वे पोलिसांच्या वतीनं आणि त्यानंतर राजभवनात पोहोचल्यावर मुंबई पोलिसांच्या वतीनं मानवंदनाही देण्यात आली.
सी.पी. राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदावर निवड झाल्यानंतर ते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले होते. त्यानंतर राष्ट्रपतींनी सध्या गुजरातचे राज्यपाल असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचीही अतिरिक्त जबाबदारी सोपवली होती.