डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी घेतली राज्यपाल यांची भेट

भारत भेटीवर आलेल्या बेल्जियमच्या राजकुमारी अ‍ॅस्ट्रिड यांनी आज राज्यपाल सी. पी.  राधाकृष्णन यांची मुंबईल्या राजभवनात भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही देशातले उद्योग, व्यापार हरित ऊर्जा, पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातले संबंध वाढवण्याबाबत चर्चा केली.  या वेळी बेल्जियमचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही उपस्थित होतं.