यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभात राज्यपालांची हजेरी

भारतामध्ये २०३६ पर्यंत उच्च शिक्षणासाठीच्या नोंदणीत ५० टक्के वाढ करण्याचं  स्वप्न फक्त मुक्त आणि दूरस्थ शिक्षण क्षमतेचा वापर करूनच साकारता येईल, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज नाशिक इथं केलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते. देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार आहे. हा बदल विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्याबरोबरच त्यांना उद्योजक बनण्यासाठी  सक्षम करेल आणि  २०४७ पर्यंत ‘विकसित भारताचं’ स्वप्न पूर्ण करण्यास पूरक ठरेल, असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.